दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक आणि त्याला वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 160 धावांवर मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघ राशिद खानच्या फिरकीपुढे ढेपाळला. दिल्ली संघ 15 धावांनी पराभूत झाला.