Friday, May 3, 2024
Homeनाशिकसीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

नाशिक | Nashik

विद्यार्थी व विविध शैक्षणिक महासंघांनी सीईटीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सीईटी सेलने पुन्हा एकदा परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे.

- Advertisement -

राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक २१ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले होते. परंतु महाविद्यालयांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला बसता आले नसते.

विद्यार्थी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक सीईटी सेल कडून जाहीर करण्यात आले आहे.

या तारखांना हाेतील सीईटी

५ वर्ष एलएलबीची सीईटी ११ ऑक्टोबर

बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाची सीईटी १८ ऑक्टोबर

बीएड., बीएड इलेक्ट परीक्षा- २१, २२ व २३ अाॅक्टाेबर

बी. एड. एमएड इंटिग्रेटेड-२७ आॅक्टाेबर

एमपीएड २९ ऑक्टोबर

एमपीएड फिल्ड टेस्ट – ३१ आॅक्टाेबर ते ३ नाेव्हेंबर

एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी २ व ३ नोव्हेंबर

बीपीएड सीईटी ४ नोव्हेंबर

बीपीएड फिल्ट टेस्ट- ५ ते ८ नाेव्हेंबर

एमएड सीईटी ५ नाेव्हेंबर

एमआर्च सीईटी २७ ऑक्टोबर

एम.एचएमसीटी २७ ऑक्टोबर

एमसीए २८ ऑक्टोबर

बी.एचएमसीटी १० ऑक्टोबर

सीईटी सेलच्या वतीने सुधारीत वेळापत्रकासंबधीची सविस्तर माहिती व परीक्षा प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांची नेहमीप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. प्रवेश पत्रावर कोणत्याही प्रकारची चूक वा त्रूटी आढळल्यास संबधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या