Sunday, May 19, 2024
Homeधुळेपिंपळनेर येथे विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पिंपळनेर येथे विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई

पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :

येथील ग्रामपंचायतीतर्फे कोविड 19 माझे गाव माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

यातंर्गत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कालपर्यंत विना मास्क फिरणार्‍या 75 नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून 7 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत 50 हजार 150 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी जनता कर्फ्यू व इतर कार्यवाही केली. त्यामुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली आहे.

तरीही नागरिकांनी विना मास्क बाहेर फिरू नये, सोशल डिस्टंचे पालन करावे, असे आवाहन सरपंच साहेबराव देशमुख, उपसरपंच विजय गांगुर्डे, ग्राम दक्षता समिती अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे व ग्रामविकास अधिकारी डी.डी. चौरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या