Sunday, May 19, 2024
Homeनाशिकआदिवासी वनजमिनीचे पट्टे वाटप आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येतील : माजी...

आदिवासी वनजमिनीचे पट्टे वाटप आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येतील : माजी आमदार आनंदराव गेडाम

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

आदिवासी वनजमिनीचे पट्टे वाटप आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येतील, असे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक जिल्हा काँग्रेस आदिवासी विकास विभागाची बैठक काँग्रेस भवन, एमजी रोड, नाशिक येथे महाराष्ट्र कॉंग्रेस आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार गेडाम यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकी दरम्यान बोलताना गेडाम म्हणाले, काँग्रेसच्या काळात वन जमिनीसाठी वन जमीन हक्क कायदा मंजूर करून देशामध्ये अनेक आदिवासी कुटुंबांना वन जमिनीचे वाटप करण्यात आले. परंतु , मध्यंतरीच्या काळात ही योजना राबविली नाही.

आता महाराष्ट्र आपले सरकार असुन आपल्या लोकांचे मंजूर प्रकरण प्रलंबित असून देखील त्याचे वाटप झाले नाही. म्हणून आपण नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचे मंजूर प्रलंबित प्रकरण तात्काळ वाटप करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नाशिक येथे शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या परवानगीने त्यांचा प्रमुख उपस्थित लवकरच कार्यक्रम घेऊन वनजमिनीचे पट्टे संबंधित लोकांना वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत दरम्यान दोन ठराव करत हाथरस येथील घटनेचा व खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारकडून पोलिसांद्वारे मिळालेल्या वागणुकीचा बैठकीत निषेध करण्यात आला.

बैठकीसाठी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे नेते रमेश कहाडोळे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, गोपाळराव लहांगे, भिका पाटील चौधरी, भारतीताई भोये, विशाल जाधव, सखाराम भोये, धर्मराज जोपळे, शिवाजी बर्डे, सुधाकर मोरे, काशिनाथ जोपळे, शरद चौरे, अशोक शेंडगे, तुकाराम जाधव, कचरू गांगुर्डे, भरत महाले, संजय निकम, राजाभाऊ गुळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या