पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या सहा वाहनांवर पिंपळनेर पोलिसांनी आज कारवाई केली.
वाहने ताब्यात घेण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.पिंपळनेर परिसरात अवैधरीत्या जास्तीच्या संख्येने मजूरांची वाहतूक केली जाते.
त्यात आज कुडाशीकडून चिवटीबारीकडे मजूर घेऊन जाणार्या सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहने पिंपळनेर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
पिंपळनेर परिसरात अवैधरीत्या जास्तीच्या संख्येने मजूरांची वाहतूक केली जाते. त्यात आज कुडाशीकडून चिवटीबारीकडे मजूर घेऊन जाणार्या सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली.
संबंधित वाहने पिंपळनेर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान अवैधरीत्या मजुरांची ने-आण करणार्या वाहनाचा अपघात होऊन डांगशिरवाडे येथील तीन मजूर जागीच ठार झाले होते.
याबाबत माजी मंत्री सुरेश धस यांनी संबंधीतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
परंतू त्यानंतर देखील अवैधरित्या मजुरांची वाहतुक सुरू असल्याने पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व पोलीस कर्मचार्यांनी कुडाशी ते चिवटीबारी रस्त्यावर सहा वाहनांवर कारवाई केली आहे. ही वाहने ताब्यात घेतली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.