Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यादिलासादायक : नाशिकमध्ये एकाच दिवसात हजार रुग्णांची करोनावर मात

दिलासादायक : नाशिकमध्ये एकाच दिवसात हजार रुग्णांची करोनावर मात

नाशिक । Nashik

जिल्ह्यात मागील चोवीस तासात अवघ्या 429 रूग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

तर त्यापेक्षा साडेसहाशेने अधिक 1 हजार 75 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा वाढत असून तो 76 हजार 248 वर पोहचला आहे. करोनामुक्त होणारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून हे प्रमाण 89 टक्क्यांवर पोहचले आहे.

मागील आठ दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 429 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 530 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 57 हजार 178 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 155 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 23 हजार 756 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 16 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 967 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 610 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 1 हजार 75 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 76 हजार 248 वर पोहचला आहे.

करोनामृत्यूमध्येही आज मोठी घटन झाली असून दिवसभरात 10 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 6, मालेगाव 1 व जिल्हा बाह्य एका रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 523 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. दिवसभरात केवळ 808 नवे संशयित दाखल झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 85,511

* नाशिक : 57,178

* मालेगाव : 3,967

* उर्वरित जिल्हा : 23,756

* जिल्हा बाह्य : 610

* एकूण मृत्यू : 1,523

* करोनामुक्त : 76,248

- Advertisment -

ताज्या बातम्या