Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली

Covid-19 : देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली

दिल्ली | Delhi

देशात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसत आहे. मागील २४ तासात करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात ५४ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ७१७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ५४ हजार ०४४ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७६ लाख ५१ हजार १०८ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६७ लाख ९५ हजार १०३ रूग्ण करोनामुक्त झाले असून ७ लाख ४० हजार ०९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख १५ हजार ९१४ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात मागील २४ तासात ८ हजार १५१ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १६ लाख ०९ हजार ५१६ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ७ हजार ४२९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ७४ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल एका दिवसात २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या