Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमनोज वाणींच्या खांद्यावर विनोद देशमुखांची बंदूक

मनोज वाणींच्या खांद्यावर विनोद देशमुखांची बंदूक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मनोज वाणी यांच्या खांद्यावर पक्षातून अलीकडेच निलंबित करण्यात आलेले विनोद देशमुख यांनी बंदूक धरत निशाणा साधला असल्याचा गंभीर आरोप शनिवारी महिला राष्ट्रवादी आघाडीतर्फे करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणात मनोज वाणी यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज महिला राष्ट्रवादी आघाडीनेही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर पलटवार केला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

…तर आमच्या स्टाईलने धडा शिकवू

विनोद देशमुख यांच्या विरोधात आधीपासूनच खूप तक्रारी होत्या. 2009 सालीच त्यांच्याविरुद्ध पक्षातील काही पदाधिकार्‍यांंनी कारवाईची मागणी करण्याचे निवेदन वरिष्ठांकडे पाठविले होते. अलीकडेच त्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियात प्रसारीत केला होता. या अनुषंगाने पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. आता त्यांना पक्षातून बडतर्फे करण्याची मागणी आमच्यातर्फे करण्यात येणार आहे. तसेच विनोद देशमुख यांनी या प्रकारचे धंदे बंद करावे; अन्यथा त्यांना आम्ही आमच्या स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा देखील कल्पना पाटील यांनी यावेळी दिला.

प्रदेशाध्यक्षाही पाठिशी

या पत्रकार परिषदेत उपस्थित असणार्‍या महिलांनी देखील या प्रकरणी पाटील कुटुंबाला अडकवण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. ही पत्रकार परिषद सुरू असतांना महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोबाईलवरून कॉल करून याप्रकरणी आमचा पक्ष हा अभिषेक पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

वाणी यांच्या आरोपात दम नाही

मनोज वाणी यांनी पाटील कुटुंबाच्या मालकीच्या उमाळे घाटाच्या पायथ्याशी असणार्‍या टर्निंग पॉइंट या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. तथापि, आपण 2007 साली ही हॉटेल सुरू केली तेव्हा पेट्रोलियम कंपनीशी करार करून एकाला ही हॉटेल चालवायला दिली होती.2009च्या निवडणुकीत आपल्याला जामनेरमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कुणी तरी या हॉटेलबाबत तक्रार केली. या अनुषंगाने पोलीस चौकशी झाली असून यात पाटील कुटुंबातील कुणाच्याही नावाचा उल्लेख नसल्याचे कल्पना पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या