Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याचेन्नईचा पंजाबवर विजय

चेन्नईचा पंजाबवर विजय

अबुधाबी । वृत्तसंस्था

चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंजाबच्या सलामीवीरांनी फलंदाजीस चांगली सुरूवात केली. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल अर्धशतकी भागीदारी केली. मयंक २६ धावांवर बाद झाला. पंजाबने पहिला बळी गमावल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल धुरा सांभाळतील अशी शक्यता होती. परंतु राहुल चांगली फलंदाजी करत असताना ३ चौकार आणि १ षटकार २९ धावांवर बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल १२ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन २ धावांवर माघारी परतला . मनदीप सिंग आणि दीपक हुड्डा यांची जोडी टिकून राहात असतानाच मनदीप १४ धावांवर बाद झाला. दीपक हुड्डाने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. अखेर पंजाब ने १५३ धावा करून चेन्नईला १५४ धावांचे लक्ष दिले .

१५४ धावांचे लक्ष समोर ठेऊन चेन्नईच्या संघाने दमदार सुरुवात केली. ड्युप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत दमदार भागीदारी करत चेन्नईला विजयाच्या लक्षाकडे नेले. ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत त्याने ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला १२५ च्या पार पोहचवले. ड्युप्लेसिसला ४८ धावांवर बाद होत चेन्नईच्या संघास पहिला धक्का मिळाला.

डुप्लेसिस बाद झाल्यानंतर चेन्नईच्या संघाची धावसंख्या मंदावली. अंबाती रायडूने व ऋतुराज गायकवाड यांनी नाबाद ८२ धावांची भागिदारी केली.

पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या