Monday, May 6, 2024
Homeनगरनोकरीचे अमिष दाखवल्या प्रकरणी शिक्षिकेसह साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोकरीचे अमिष दाखवल्या प्रकरणी शिक्षिकेसह साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तलाठी, शिक्षक म्हणून नोकरीला लावून देते असे सांगून सात जणांची 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

- Advertisement -

दोन शिक्षकांसह तिघांविरूध्द राहाता पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या रॅकेटची सूत्रधार नाशिक जिल्ह्यातील महिला व तिचा पती असून सर्वजण फरार झाले आहेत.

ही फसवणुकीची घटना सन 2014 ते 7 सप्टेंबर 2020 या कालावधीत राहाता येथे घडली आहे. याप्रकरणी धिरज प्रकाश पाटील, रा. साकुरी, ता राहाता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दिनेश गोविंद सोनवणे, पत्नी बिना दिनेश सोनवणे (गायकवाड), नाशिक जिल्हा भाऊसाहेब पांडुरंग पेटकर (लोणी) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तिघेही आरोपी फरार झाले आहेत.

यातील फिर्यादी धिरज पाटील हे साकुरी येथे राहत असताना बिना सोनवणे व दिनेश सोनवणे यांची ओळख झाली. पाटील पती-पत्नी हे दोघे बीएबीएड असल्याने तुम्हाला रयत शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो. त्यासाठी 20 लाख रुपये घेतले. तसेच सुधाकर जाधव राहाता यांना तलाठी म्हणून नोकरी लावण्यासाठी 10 लाख 44 हजार, प्रगती किरण खडांगळे, रा. साकुरी 2 लाख, घनशाम शिवदास खैरनार (रा. महाड, जि. रायगड) याच्याकडून नोकरीसाठी 8 लाख, सागर कांतिलाल खैरनार 3 लाख, अरूणा गणेश पडवळ रा. राहाता 6 लाख 40 हजार, संजीवनी सोनवणे 3 लाख 10 हजार, कल्पेश रमेश पथके 5 लाख अशी सात जणांकडून विविध खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून 57 लाख 94 हजार रूपये घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यातील आरोपी महिला बिना सोनवणे ही राहाता येथील रयत शिक्षण संस्थेत काही दिवस हंगामी शिक्षिका म्हणून काम करत होती तर तिचा पती धुळा येथे शासकीय नोकरीत मोठ्या हुद्यावर असल्याचे तो सांगत असे तर तिसरा आरोपी हा रयत शिक्षण संस्थेत सेवेत होता. या तिघांनी मिळून ही सर्व फसवणूक केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असून यातील पैशाच्या रकमा रोख व चेकद्वारे तसेच ऑनलाईन स्वीकारल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

पैसे दिल्यानंतर कोणतीही नोकरी मिळाली नाही. वेळोवेळी टाळाटाळ केली गेली नंतर तगादा वाढू लागल्याने या दोन्ही शिक्षकांनी राहाता येथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी राहाता पोलिसांत तक्रार अर्ज दिला. चौकशीसाठी तो नगर येथे गुन्हा शाखेकडे पाठविण्यात आला.

सत्यता तपासल्यानंतर राहाता पोलिसांनी वरील तिन्ही आरोपी विरोधात वैयक्तीत फायद्यासाठी मोठ्या पदावर असल्याचे सांगून नोकरी लावून देतो असे अमिष दाखवत सात जणांची सुमारे 58 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात राहाता पोलिसांनी भादंवी कलम 420, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पो. नि. सुभाष भोये व त्यांचे सहकारी पो. हे. कॉ. सुरेश गागरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या