Friday, May 3, 2024
Homeनाशिकबालदिन यंदा 'बालदिवस सप्ताहा'ने हाेणार ऑनलाइन

बालदिन यंदा ‘बालदिवस सप्ताहा’ने हाेणार ऑनलाइन

नाशिक | प्रतिनिधी

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी (१४ नोव्हेंबर) साजरा केला जाणारा बालदिन यंदा ‘बालदिवस सप्ताह’ म्हणून साजरा केला जाणार आहे. शासनातर्फे ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान हा सप्ताह ऑनलाइन पद्धतीने राबवला जाणार असून त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन बाल ई साहित्य संमेलनासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

- Advertisement -

दरवर्षी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळांमध्ये उपक्रम घेतले जातात. मात्र यंदा करोना संसर्गामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे बालदिवस सप्ताह ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिली ते बारावीच्या वर्गातील एकूण सात गटांत उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यात पत्रलेखन, भाषण, नाटय़छटा, स्वलिखित कविता, कविता वाचन, पोस्टर तयार करणे, निबंध लेखन आदी उपक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांना त्यांचे सादरीकरण विविध समाज माध्यमांमध्ये अपलोड करावे लागणार आहे.

तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षकांना काम

सप्ताहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक मदत करण्यासाठी शिक्षकांना उपलब्ध राहावे लागणार आहे. या सप्ताहामुळे शिक्षकांना सुटीच्या पहिल्या दोन दिवशीही काम करावे लागणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या