Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशबायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,कमला हैरिस उपराष्ट्राध्यक्ष

बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,कमला हैरिस उपराष्ट्राध्यक्ष

वॉशिग्टन | Washington

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते शपथ घेतील. कमला हैरिस उपराष्ट्राध्यक्ष झाल्या आहेत.

- Advertisement -

निवडणुकीच्या निकालाकडे जगाचं लक्ष होतं. जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या दोन राज्यांमध्येही जो बायडन हेच आघाडीवर असल्याने ते जिंकले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तेच शपथ घेतील असं स्पष्ट वृत्त अमेरिकेतील सीएनएन वाहिनीने दिलं आहे.

जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतली तेव्हाच निवडणुकीच चित्र स्पष्ट झाल होतं.

जो बायडन यांना 20 इलेक्ट्रोल मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण इलेक्ट्रोल मतांची संख्या 264 वरुन 284 झाली आहे. त्यामुळे बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील यात काहीही शंका नाही असे असोशिएट प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

निकाल समोर येताच जो बायडन यांनी ट्विट करुन अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवलं हा मी माझा बहुमान समजतो असंही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या