Tuesday, May 7, 2024
Homeनगरछावा संघटनेचे घंटानाद आंदोलन

छावा संघटनेचे घंटानाद आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ई-निविदा प्रक्रिया खाजगी ठिकाणी भरणार्या संगणक चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व संगणक चालकांचे

- Advertisement -

आय पी ऍड्रेस तपासावे, अशी मागणी करीत अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. ई-निविदा प्रकिया बाबत अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने 21 जानेवारीपासून आंदोलन करत आहेत.

दोन वेळा उपोषण देखील करण्यात आले आहे. अनेक लेखी आश्वासन दिले गेली. प्रत्यक्ष सगळे ग्रामसेवक दोषी असताना कारवाई मोजक्याच लोकांवर करण्यात आली आहे. प्रत्यक्ष टेंडर ज्या खाजगी संगणक चालकांकडे झाले.

त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय लायसन्स नाही. म्हणून ज्या ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी दलित वस्ती योजनेसाठी असणारी डी एस सी कधी कोणी वापरली याची संपूर्ण चौकशी करून गटविकास अधिकारी यांची दैनंदिनी तपासावी.

त्यांच्यावर शिस्तभंंगाची प्रशासकीय गोपनीय माहिती बाहेर पुरवल्याची कारवाई करावी, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, किशोर शिकारे, महेश चव्हाण, कृष्णा गागरे, अक्षय झिने, मयुर भुयाळ, हर्षद बिराडे, गणेश पटारे, अविनाश क्षिरसागर, रमेश म्हसे, दादा बडाख, प्रविण देवकर, सुहास निर्मल, परिमल दवणगे, विरेश बोठे, शरद बोंबले, ताराचंद राऊत आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या