Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिन्नरमधील 'हे' कोविड सेंटर झाले सामसूम

सिन्नरमधील ‘हे’ कोविड सेंटर झाले सामसूम

सिन्नर | Sinnar

गेल्या 20-22 दिवसांपासून तालुक्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून आरोग्य विभागाने सात महिण्यानंतर पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने सुट्टी अनुभवली आहे.

- Advertisement -

रतन इंडियातील कोवीड केअर सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही रुग्ण नाही. तर शहरातील करोना हेल्थ सेंटरमध्ये 5-6 च रुग्ण दररोज उपचार घेत आहेत. सिन्नरकरांसाठी ही सुखद अशीच घटना म्हणावी लागेल.

गेल्या 6-7 महिण्यांमध्ये तालुक्यात दररोजच 20-25 ते 40-50 रुग्ण आढळत होते. उपजिल्हा रुग्णालय कमी पडू लागल्यानंंतर रतन इंडियाच्या आवारात दुसरे कोवीड केअर सेंटर उभारावे लागले. दोन्ही रुग्णालये जवळपास सहा महिने हाऊसफूल्ल होती.

उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये तीसच रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था असतांना तेथे शंभरहून अधिक रुग्ण दाखल करावे लागत होते. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी, सेवकांना करोनाचा संसर्ग झाला होता.

आजमितीस या कोविड सेंटर मध्ये एकही रुग्ण शिल्लक नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या