Wednesday, May 8, 2024
Homeजळगावपारोळा : पाडवा पहाट कार्यक्रमाने झपाटभवानी मंदिर उघडले भक्तांसाठी

पारोळा : पाडवा पहाट कार्यक्रमाने झपाटभवानी मंदिर उघडले भक्तांसाठी

पारोळा – Parola – श:प्र :

येथील पुरातन झपाटभवानी गजानन महाराज संस्थान येथे दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम करून राज्यातील मंदिरे उघडल्याचा आनंद साजरा करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी संस्थानचे माऊली भजनी मंडळातर्फे भक्तीसंगीत व भावगीते सादर करण्यात आली.अध्यक्ष व म.उपनगराध्यक्ष मंगेश तांबे,गिरीश टोळकर, जयेश सोनार यांनी विविध गीते व भक्तिगीते सादर केली.

मोहित तांबे व जयेश सोनार यांनी तबला व मृदुग तर गिरीश टोळकर हार्मोनियम वर आणि कार्यक्रमात सतीश वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग व मास्क तसेच सॅनिटायझेर ची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष संजय सोनार ,जावेद मिस्त्री,दिपकजी पिले,रवी चौधरी,पुष्कराज संत,कुणाल मोरे,संदीप वानखेडे, यांनी परिश्रम घेतले तसेच संगीत शिक्षक श्री संजय रमेश पिले यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या