Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादिंडोरी तालुक्यात पावसाची रिमझिम; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा संकटात

दिंडोरी तालुक्यात पावसाची रिमझिम; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा संकटात

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात रात्रीपासून ढगाळ वातावरण होऊन सकाळी सहा वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे द्राक्षबागाना फटका बसण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत अडकल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

तालुक्यात उशिरा छाटलेल्या बागा फुलोरा अवस्थेत असल्यामुळे पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मणीगळीसह कुजीची शक्यता निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे सर्वच द्राक्षबागाना यांचा फटका बसून फवारणीचा खर्च वाढणार असल्याचे बोलले जाते आहे.

रिमझिम पावसामुळे द्राक्षबागावर डावणी, भुरी रोगाचा प्रादूर्भाव वाढून द्राक्षबागा रोगाला बळी पडतात. परिणामी, अनेक महागडी रासायनिक औषधाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

द्राक्ष उत्पादक शेकतरी वर्ग आधीच संकटात असून चालू वर्षी द्राक्षबागावर मोठ्या प्रमाणात घड कमी निघाले असून यंदा अनेक द्राक्षबागा फवारणीसाठी सुद्धा महाग आहे.

द्राक्षबागा कमी निघाल्या तरी खर्च कमी होत नाही फवारणी करावीच लागते. आतापर्यत द्राक्षबागाना मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून या ढगाळ व रिमझिम पावसामुळे शेतकरी वर्गात धडकी भरली असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या