Friday, May 3, 2024
Homeजळगावखोदकामात सापडली जूनी नाणी

खोदकामात सापडली जूनी नाणी

सुनसगाव – भुसावळ – Bhusaval – वार्ताहर :

येथून जवळच असलेल्या गोजोरे गावात जुन्या घराचे खोदकाम करताना नाणी सापडल्याची घटना घडली मात्र गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने पोलीसांना माहिती देऊन पाहणी करण्यात आली.

- Advertisement -

या बाबत माहिती अशी की काल दि १९ रोजी दुपारी परशुराम ज्ञानदेव राणे रा. गोजोरा यांच्या जुने घर पाडण्याचे काम सुरू होते .

यावेळी परशुराम राणे यांच्या घरातील देवघर ( देव्हारा ) जवळ सोन्याची घागर सापडल्याची अफवा गावात पसरली असता पोलीस पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये ही माहिती कळवली असता भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो.नि.रामकृष्ण कुंभार यांनी या बाबत माहिती तहसीलदार भुसावळ यांना सांगितली आणि पो नि रामकृष्ण कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन गोजोरे गावात येऊन घटना स्थळी पाहणी केली असता जुन्या काळातील १८६२ ,१८७२ ,१८८६ आणि १९०१ या सालातील एकूण १९ नाणी असल्याचे सांगितले .

या ठिकाणी सहा.पो.नि . अमोल पवार व भुसावळ तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार शशीकांत इंगळे यांनी पंचनामा करून सर्व नाणी सील केल्याचे

समजते . गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने गोजोरे येथील राणे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समजते आणि वेळीच पोलीस व महसूल चे अधिकारी व कर्मचारी पोहचल्याने नाण्यांची सत्यता बाहेर आली असे सुज्ञ नागरिकांनी सांगितले .

या परिसराचे मंडळ अधिकारी सतिश इंगळे यांनी याबाबत माहिती दिली.यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे विठ्ठल फुसे , युनूस शेख व पोलीस कर्मचारी उपस्थित होते . या घटनेनंतर गावात मात्र ठिकठिकाणी गावकरी चर्चा करतांना दिसत होते

- Advertisment -

ताज्या बातम्या