Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रया चार राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात सर्शत प्रवेश

या चार राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रात सर्शत प्रवेश

मुंबई:

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत अाहे. यामुळे राज्य सरकारने प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -

दिवाळीनंतर दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रातही हा आकडा वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मिशन बिगीन अगेन अंतर्गत गोवा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.

काय आहे नियम

महाराष्ट्रात यायचे असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा लागेल. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवले जाईल, असे राज्य सरकारने नव्या नियमावलीत नमूद केलं आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येताना कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्रं सोबत आणावं लागणार आहे. विमान, रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. २५ नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार असल्याचं नोटिफिकेशन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या