Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याडिजिटल पेमेंट करताना गुगल पे आकारणार पैसे

डिजिटल पेमेंट करताना गुगल पे आकारणार पैसे

नाशिक | प्रतिनिधी

तुम्ही जर ‘गुगल पे’द्वारे पैशांची देवाणघेवाण करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. डिजिटल पेमेंटकरण्यासाठी जानेवारीपासून पिअर-टू-पिअर पेमेंट फॅसिलिटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यामुळे युजर्सना काही शुल्क द्यावे लागणार आहे ते किती असेल याबाबत कुठलीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवता तेव्हा पैसे हस्तांतरित होण्यास एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्ड वापरून त्वरित हस्तांतरित केले जाते. कंपनीने सपोर्ट पेजना अशी घोषणा केली आहे की, जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने पैसे पाठवता तेव्हा 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर शुल्क आकारले जाते.

गुगलकडून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करण्यावर चार्ज घेतला जाऊ शकतो. तसेच गुगलकडूनगेल्या आठवड्यात काही फीचर लाँच करण्यात आले आहेत. हे सर्व फीचर अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी देण्यात आले आहेत. तसेच कंपनीने Google Pay च्या लोगोमध्ये देखील बदल केले आहेत.

त्यामुळे यापुढे गुगल पे मधून पेमेंट करताना युजर्सला काही शुल्क द्यावे लागणार आहे. अर्थात आता डिजिटल पेमेंटसाठी पैसे लागणार असून किती हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या