Friday, May 3, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया गाजवण्यासाठी भारतीय संघाचे शिलेदार सज्ज

ऑस्ट्रेलिया गाजवण्यासाठी भारतीय संघाचे शिलेदार सज्ज

मुंबई । Mumbai

सावधान ऑस्ट्रेलिया! आयपीएलमुळे विखुरले गेलेले भारतीय संघाचे शिलेदार आता पुन्हा एकदा झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज खेळवण्यात येत आहे.

- Advertisement -

पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ कसून सरव करत आहेत. हे मैदान बिगबेश संघ सिडनी सिक्सर्स आणि न्यू साऊथ वेल्स संघाचे घरचे मैदान आहे. या मैदानावर पॅडिंग्टन एन्ड आणि रँडविक एन्ड असे दोन एण्ड्स आहेत दोन्ही संघांमध्ये अनेक म्याचविनर खेळाडू असल्यामुळे एक रंगतदार मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

या मालिकेसाठी दोन्ही संघांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. ऑस्ट्रेलिया संघात केन रिचडसन आपल्या वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्याजागी अँड्रू टायला संघात स्थान देण्यात आले आहे. तर भारतीय संघात लोकेश राहुल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो संघाचा उपकर्णधार असणार आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त शुभमन गील, मयंक अगरवाल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, विराट कोहली, लोकेश राहुल यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये हार्दिक पंड्या, आणि रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मोहंमद शमी, युझवेन्द्र चहल आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीची मदार डेविड वॉर्नर, एरन फिंच, स्टीव्ह स्मीथ, डार्सी शॉर्ट, अलेक्स केरी यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये मर्नास लबूशेन, एस्टर्न इगेर, इस्टर्न टर्नर आहेत. गोलंदाजीत पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, आणि अँड्रू टाय आहेत.

आमनेसामने १४० ऑस्ट्रेलिया विजयी ७८ भारत विजयी ५२, पहिली द्विपक्षीय मालिका विजयी ऑस्ट्रेलिया १९४७-४८, अखेरची मालिका २०१८-२०१९ भारत, विजयी एकूण मालिका २६ भारत विजयी ९ ऑस्ट्रेलिया विजयी १२ ५ अनिर्णित सर्वाधिक धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया सचिन तेंडुलकर ३०७७, सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकर ९ सर्वाधिक षटकार रोहित शर्मा ७६, बेस्ट बॉलिंग मुरली कार्तिक ६-२७ धावा हायस्ट इंडिविज्युअल स्कोर २०९ रोहित शर्मा.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या