Friday, May 3, 2024
HomeUncategorizedVideo : देशदूत 'आम्ही' : रोटरी क्लबच्या सदस्यांशी चर्चा...

Video : देशदूत ‘आम्ही’ : रोटरी क्लबच्या सदस्यांशी चर्चा…

देशदूत ‘आम्ही’ सदर

संस्थेचे नाव : ‘रोटरी क्लब’ नाशिक.

- Advertisement -

सहभाग : रमेश मेहेर, भावी प्रांतपाल ३०३०, कविता दगावकर अध्यक्ष रोटरी ग्रेप सिटी.

संवाद : रवींद्र केडिया, प्रतिनिधी नाशिक.

सबंध महाराष्ट्र राज्यासह नाशिक जिल्ह्यात रोटरी क्लब सक्रीय आहे. अनेक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून मनोभावे केली जात आहे.

संस्थेकडून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मातीपरीक्षण, पाणी परीक्षण करून पिक घेण्याबद्दलचे मोठे कार्य हाती घेतले जाणार आहे. यासोबतच, मुलींसाठी, महिलांसाठी ही संस्था वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहे.

आता तर या संस्थेला सीएसआर म्हणजेच सामाजिक जबाबदारी फंडातूनदेखील मदत होत आहे. त्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र तर वाढलेच आहे शिवाय संस्थेची व्याप्तीदेखील यानिमित्ताने वाढलेली आहे.

अवघ्या चार जणांनी सुरु केलेली ही संस्था १९०५ मध्ये स्थापन झाली होती. आज या संस्थेचे जगात १२ लाखांपेक्षा अधिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य केले जाते. संस्थेचे १ जुलै ते ३१ जून असे वर्ष असते

तर दरवर्षी निवडणूकदेखील कुठलीही घोषणा न करता पार पडते हे विशेष.

- Advertisment -

ताज्या बातम्या