Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयजिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रिपब्लिकन पार्टी आक्रमक

जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रिपब्लिकन पार्टी आक्रमक

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शेळगाव येथे बौद्ध विहारानजीकच स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामास मंजूरी देणार्‍या लोकप्रतिनिधीसह अधिकार्‍यांवर

- Advertisement -

निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हा परीषद कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले.

जळगांव तालुक्यातील शेळगाव येथे ग्रामपंचायतीच्या अन्य ठिकाणी जागा उपलब्ध असतांना हे बांधकाम केले जात आहे.

बांधकाम ठिकाणी अपप्रकार घडल्यास सदस्य,ग्रामसेवक, सरपंच आदी जबाबदार रहातील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, रवि सपकाळे, गिरीष तायडे, अशोक बोरेकर, मिलिंद तायडे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, सुरेश सपकाळे, बंडू तायडे, विशाल तायडे, भानुदास पाटील, निळकंठ गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या