Tuesday, May 7, 2024
Homeनगरविसापूरमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

विसापूरमधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील विसापूरमधील लता मधुकर शिंदे या महिलेच्या हत्या प्रकरणातील अज्ञात आरोपीची कोणतीही माहिती उपलब्ध नसताना

- Advertisement -

केवळ सी. सी. टी.व्ही. फुटेजच्या आधारे कौशल्यपूर्ण व कसोशिने तपास करून 72 तासांच्या आत बेलवंडी पोलिसांनी आरोपीस अटक करण्याची दमदार कामगिरी केली.

दि. 3 व 4 डिसेंबरचे दरम्यान विसापूरच्या शिवारात रमेश पंधरकर यांच्या नंदी मळ्यातील तुटून गेलेल्या उसाच्या शेतात लता मधुकर शिंदे (वय 56, रा. विसापूर ता. श्रीगोंदा) हिस टणक वस्तूने तिच्या डोक्याच्या पाठीमागील बाजुस मारून तिचा खून करून पुरावा नाहीसा व्हावा या उद्देशाने तिचा मृतदेह उसात टाकून दिला. याबाबत मयताचा भाऊ बाळू मधुकर शिंदे (रा. विसापूर) यांनी फिर्याद दिल्याने बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांनी सदर गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींबाबत माहिती घेतली.त्यानंतर पो. नि. अरविंद माने बेलवंडी पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींचा शोध घेण्याकामी बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची वेगवेगळी पथके तयार करून सूचना दिल्या.

त्याचप्रमाणे पो. नि. कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून सदर गुन्ह्याचा बेलवंडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा हे समांतर तपास करत असताना घटनास्थळाचे आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध घेत असताना सी. सी. टी. व्ही.च्या अधारे पो. नि. अरविंद माने, पो. स. ई. प्रकाश बोराडे, पोलीस काँ. दादासाहेब क्षीरसागर यांच्या पथकाने आपले कौशल्य वापरून शिताफीने आरोपी मुकेश मोतिलाल गुप्ता (वय 28, रा. महेबूबपुरा, ता. जि. भदोई, उत्तर प्रदेश, हल्ली रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा जि. नगर) यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्याच्याकडून तपासाअंती महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटिल, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव कर्जत विभाग कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, बेलवंडी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस स. इ. प्रकाश बोराडे, सहाय्यक फौजदार भापकर, पोलीस हे. कॉ. बारवकर, पोलीस नाईक नंदकुमार पठारे, पो.कॉ. दादासाहेब क्षीरसागर, पोलीस कॉ. संदीप दिवटे, पोलीस कॉ. सचिन पठारे, पोलीस कॉ. संतोष धांडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हे. कॉ. बबन मखरे, पोलीस नाईक कुसाळकर, पो.कॉ. प्रकाश वाघ, पो. कॉ. रवींद्र धुंगासे, पोलीस काँ. रोहिदास नवगिरे, पोलीस काँ. रोहीत मिसाळ, पोलीस काँन्स्टेबल रंजित जाधव, पोलीस काँ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या