Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यादिव्यांगांसाठी 'महाशरद' अ‌ॅपचे उद्या लोकार्पण

दिव्यांगांसाठी ‘महाशरद’ अ‌ॅपचे उद्या लोकार्पण

मुंबई। प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे निमित्त साधत सामाजिक न्याय विभागाने दिव्यांगांसाठी ‘महाशरद’ अ‌ॅपची निर्मिती केली असून त्याचे लोकार्पण उद्या, शनिवारी होणार आहे.

- Advertisement -

याशिवाय विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) चे ‘ई-बार्टी’ हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले असून त्याचेही लोकार्पण आज करण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज या दोन उपक्रमांची माहिती दिली.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे अशा गरजू दिव्यांग व्यक्तींची आणि दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

‘महाशरद’ प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ १३ डिसेंबरपासून सुरू होत असून मार्च २०२१अखेरपर्यंत मोबाईल ॲप्लिकेशन स्वरूपात देखील हप्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

डिजिटल युगात राज्यात स्मार्टफोन मोबाईलधारकांची संख्या कोट्यवधीच्या घरात असून, ‘बार्टी’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांना कमीत कमी वेळेत, आपल्या मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळावी या दृष्टीने हे अॅप तयार केल्याचे मुंडे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या