मलकापुर – Malkapur
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया बुलडाणा, यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना बुलडाणा जिल्हयातील अवैध अग्निशस्त्रे विकण्याऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते.
त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी पथके नेमली होती. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा पथकाने दि.12 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, काही इसम अवैध अग्निशस्त्र विक्री करीता घेवुन येत असल्याची बातमी मिळाल्यावरुन बऱ्हाणपुर चौक पोलीस स्टेशन जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा येथे नाकाबंदी केली असतांना दोन अनोळखी इसम मध्य प्रदेश मधुन दुचाकीने येतांना दिसले. ती दुचाकी पोलीस स्टाफचे मदतीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक इसम पकडण्यात आला.
एक इसम अंधाराचा फायदा घेवुन जगंलाच्या दिशेने पळुन गेला. पकडलेल्या ईसमांस नाव गांव विचारले आता त्याने त्याचे नाव भोरु भुवानसिंग रावत वय 25 वर्ष रा. शेकापुर ता.खकनार जि. ब-हाणपुर मध्ये प्रदेश असे सांगतले.नमुद आरोपीकडुन पुढील प्रमाणे मुददेमाल जप्त करण्यात आला. 1) एकुण पाच देशी बनावटीचे कटटे मॅगझिनसह एकुण किं. 2,50,000 रु. 2) 15 जिवंत काडतुसे एकुण किं. 7500 रु. 3) एक दुचाकी किं. 50,000 रु. 4) एक सँमसंग दोन सिम असलेला मोबाईल किं. 5000 रु. 5) नगदी 1940 रु. असा एकुण 3,14,440 रु. मुददेमाल जप्त करुन आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे कार्यवाही कामी पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांचे ताब्यात दिले.
नमुद कार्यवाही अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक बुलडाणा, हेमराजसिंह राजपुत, अपर पोलीस अधीक्षक खामगांव,बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली, बळीराम गिते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांचे आदेशाने नागेशकुमार चतरकर, निलेश शेळकेश्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ. अत्ताउल्लाखान, पोना. गजानन आहेर, पोकॉ.युवराज शिंदे, पोकॉ. सतिष जाधव, मपोकॉ. सरिता वाकोडे यांनी सदर कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली.