Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनDrug case : NCB कडून अर्जुन रामपालची उद्या होणार चौकशी

Drug case : NCB कडून अर्जुन रामपालची उद्या होणार चौकशी

मुंबई l Mumbai

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट देखील समोर आले. यात आतापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्री आणि अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली. NCB आतापर्यंत अनेकांना समन्स देखील पाठवले.

- Advertisement -

त्यात अलीकडेच अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्या मुंबई स्थित घरात देखील NCB ने छापा टाकला. त्यानंतर त्याला समन्स बजावून त्याची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा त्याला NCB कडून समन्स बजावण्यात आले आहे. उद्या (१६ डिसेंबर) पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मागील चौकशीनंतर NCB कार्यालय सोडल्यानंतर अर्जुन रामपाल १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे आहे असे म्हणाला होता. ड्रग्जशी माझा काही संबंध नाही. परंतु एनसीबी या प्रकरणात जे काम करत आहे ते बरोबर आहे. NCB चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये NCB लाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे पुढे रामपाल म्हणाला होता.

यापूर्वी NCB च्या अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले होते की, अर्जुन रामपालचा परदेशी मित्र पॉल गायार्ड याला एनसीबीने अटक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गायार्डला NCB च्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यापूर्वी NCB ने रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रायडिस हिच्याकडे सलग दोन दिवस चौकशी केली.

आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणी दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, यांसह अनेक दिग्गज कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान मागील 2-३ दिवसात NCB ने मुंबईत ५ ठिकाणी धाड टाकली. यात अंधेरी, मालाड, खारघर, कोपरखैरणे आणि लोखंडवाला या ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील ड्रग्ज कनेक्शन हळूहळू समोर येत असून आणखी कोणाची नावे समोर येतील हे काही दिवसांतच कळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या