Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रनवे कृषी कायदे : मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी दोन वाजता बैठक

नवे कृषी कायदे : मंत्रिमंडळ उपसमितीची आज दुपारी दोन वाजता बैठक

मुंबई –

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 22 दिवसांपासून दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू

- Advertisement -

आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज (गुरुवारी) दुपारी दोन वाजता मंत्रालयात मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांवर चर्चा केली जाणार आहे.

राज्यात कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी या कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांवर चर्चा होणार आहे. यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. त्रुटी आणि उणिवांबाबत अभ्यास करणार्‍या उपसमितीसोबत आज मंत्रालयात खलबंत होणार आहेत. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांची अंमलबजावणी करणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या