Friday, May 3, 2024
Homeराजकीयनिंभारीत गडाख गटाच्याच दोन पॅनलमध्ये लढतीची चिन्हे

निंभारीत गडाख गटाच्याच दोन पॅनलमध्ये लढतीची चिन्हे

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील निंभारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.

निवडणुकीत ना. शंकरराव गडाख समर्थक आमने-सामने आपापले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत तीन प्रभागांतून नऊ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. गावातील एकूण मतदार संख्या 1789 आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण या निवडणुकीत चुरशीचे दिसत आहे. ना गडाख यांचे समर्थक दोन वेगवेगळ्या पॅनलची स्थापना करून लढण्याचे चिन्ह दिसत आहे.

आज तरी स्थानिक पुढारी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत जोर लावताना दिसत आहेत.आपापल्यापरीने प्रभागातून उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागेल यासाठी डावपेच आखताना दिसत आहेत. पण माघारीनंतरच खर्‍या अर्थाने या ग्रामपंचायत निवडणुकीला जोर पाहायला मिळू शकतो.

दोन्ही पॅनलकडून आजतरी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.कोण उमेदवार कोणत्या प्रभागातून उभा करायचा, सत्ताधारी गटाकडून विकास कामाच्या जोरावर निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. तर विरोधकांनीही करावयाच्या कामाचे व्हिजन तयार करून व झालेल्या विकास कामांबद्दलचे विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केल्याचे दिसत आहे.

निवडणुकीचे खरे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत मतदार यादीचे अवलोकन करून कोणत्या प्रभागात कोणाची उमेदवारी प्रबळ ठरेल याचे आडाखे बांधले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या