Monday, May 6, 2024
Homeनाशिकआग्रारोडवरील वाहतूक वळवली

आग्रारोडवरील वाहतूक वळवली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचवटीतील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनवरील के. के. वाघ कॉलेज ते स्पेस इंटरनॅशनल स्कूलपर्यंत फेज 1 मध्ये (200 मीटर) उड्डाणपुलाचे काम होणार असल्याने सध्या मुख्य महामार्गावरील अ‍ॅटग्रेड रोडने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) सूचनेनुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर वाहतूक शाखेकडून माहिती घेऊन दोन्ही बाजूकडील वाहतूक सर्व्हिसरोडने वळवण्यात आल्याची अधिसूचना गुरुवारी प्रसिद्ध केली.

- Advertisement -

दरम्यान, वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी शहर वाहतूक विभागाकडून एक पोलीस अधिकारी, चार अंमलदार, एनएचएआयचे चार वॉर्डन चोवीस तास शिफ्टनुसार तैनात राहणार आहेत. के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज ते के. के. वाघ बाजूकडील उड्डाणपूल रॅम्पपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील द्वारका ते अमृतधाम चौक उड्डाणपूल जोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहतूक नियमन व नियंत्रणासाठी निर्बंध अंमलात आणले आहेत. त्या

नुसार के.के.वाघ कॉलेज ते स्पेस इंटरनॅशनल स्कूलदरम्यान मुंबई बाजूकडे जाणारी (पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे) सर्व प्रकारची वाहतूक अ‍ॅटग्रेड रोडने सुरू होती. आता उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने रोड बंद करण्यात आला असून सर्व प्रकारची वाहतूक के. के. वाघ कॉलेजजवळील पोल क्र. 68 येथून सर्व्हिसरोडने स्पेस इंटरनॅशनल स्कूल (के. के. वाघ कॉलेज उड्डाणपूल रॅम्प)पर्यंत (150 मीटर) वळवण्यात आली आहे.

एकेरी वाहतूक सुरू

स्वामीनारायण चौकाकडून अमृतधाम चौकाकडे जाण्यासाठी (मीनाताई ठाकरे स्टेडियम टी पॉईंट पश्चिम बाजूकडून पूर्व बाजूकडे) सर्व्हिसरोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना ‘एकेरी वाहतूक’ करण्यात आली आहे. तर अमृतधाम चौक ते स्वामीनारायण चौकाकडे येण्यासाठी (के. के. वाघ कॉलेज बाजू पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे) येण्यासाठी सर्व्हिसरोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

स्वामीनारायण चौकाकडून अमृतधाम चौक बाजूकडे ( के. के. वाघ कॉलेज बाजू पूर्वकडून पश्चिमकडे) जाण्यासाठी सर्व्हिसरोडवर प्रवेश बंद करण्यात आला असल्याने स्वामीनारायण चौक ते अमृतधाम (मीनाताई ठाकरे स्टेडियम पश्चिम बाजूकडून पूर्वकडे) जाऊन इतरत्र जातील.

स्वामीनारायण चौक ते अमृतधाम बाजूकडे ( के. के. वाघ कॉलेज बाजू पश्चिम बाजूकडून पूर्व बाजूकडे) जाण्यासाठी सर्व्हिसरोडवर प्रवेश बंद करण्यात आल्याने अमृतधाम चौकाकडून पोल क्र. 64 येथील डायव्हर्शन पॉईंटकडून डावीकडे वळण घेऊन सर्व्हिसरोडने के. के. वाघ कॉलेज उड्डाणपूल रॅम्प येथील डायव्हर्शन पॉईंटकडून उजवीकडे वळण घेऊन अ‍ॅटग्रेड रोडने स्थानिक वाहने शहरात तसेच उडाणपुलावरून जड-अवजड वाहने (मुंबई बाजूकडे) जातील व तेथून इतरत्र जातील.

के. के. वाघ कॉलेज ते स्पेस इंटरनॅशनल स्कूलदरम्यान परिसरातील मातृदर्शन सोसायटी, परिसरातील नागरिकांनी सर्व्हिसरोडवर उजवीकडे वळण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. डावीकडे वळण घेऊन के. के. वाघ कॉलेज उड्डाणपूल रम्प डायव्हर्शन पॉईंटने स्वामीनारायण चौकाकडे येतील.

तसेच जाताना – मीनाताई ठाकरे स्टेडियमकडील सर्व्हिसरोडने अमृतधाम चौकाकडून उजवीकडे वळण घेऊन सर्व्हिसरोडने के. के. वाघ सर्व्हिस रोडने मातृदर्शन सोसायटीकडे जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या