Friday, May 3, 2024
Homeमनोरंजन'गंगुबाई काठियावाडी'चे चित्रीकरण थांबवण्याची मागणी

‘गंगुबाई काठियावाडी’चे चित्रीकरण थांबवण्याची मागणी

मुंबई l Mumbai

चित्रपट निर्माता व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वेगवेगळ्या चित्रपटावरून बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. बाजीराव मस्तानी, पद्मावत नंतर त्यांचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

- Advertisement -

आलिया भट्टची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाचं शूटिंग अद्याप पूर्ण झालं नाही, त्याआधीच हा चित्रपट कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा बाबूजी रावजी शाह (Babuji raoji shah) यांनी हा खटला दाखल केला आहे.

संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त लेखक हुसेन झैदी, जेन बोर्गिस आणि भन्साळी प्रॉडक्शनच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं शूटिंग मध्येच थांबविण्यात आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा ‘गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग सुरू झालं आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाची कथा ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेतली आहे. या चित्रपटाचं रात्रीचं शुटींग पूर्ण झालं आहे.

बाबूजी शहा यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, हे पुस्तक त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत आहे. त्यांनी पुस्तकातील काही भाग हटवण्याची आणि भन्साळी यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांनी पुस्तकाची छपाई आणि विक्रीवरही प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी २२ तारखेला झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने संजय लीला भन्साळी यांना ७ जानेवारीपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठीचा अवधी दिला आहे. तसेच या प्रकरणी भन्साळी आणि अन्य व्यक्तींविरुद्ध मानहानी, महिलेला चुकीच्या पद्धतीने पडद्यावर चित्रीत करणे आणि अन्य आरोपांखाली खटला दाखल होऊ शकतो. या चित्रपटाचा प्रोमो जाहीर झाल्यानंतर गंगुबाईंच्या कुटुंबासंबंधी अफवांचं पीक आलं आहे. त्यांना नको नको ते आरोप सहन करावे लागल्यामुळे मानसिक त्रास होत आहे, असं शहा यांचं म्हणणं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या