Tuesday, May 7, 2024
Homeजळगावगावठी पिस्तूल, काडतुसांसह अटकेतील तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

गावठी पिस्तूल, काडतुसांसह अटकेतील तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील लाठी शाळेतील मनपाच्या घरपट्टी विभागाचे कार्यालय फोडून 3 संगणक, प्रिंटर असा दिड लाखांचा ऐवज लांबविणार्‍या तीघा संशयितांना न्यायालयाने 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना वर्ग करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेच्या पकाने अविनाश रामेश्वर राठोड (वय-21,रा.रामेश्वर कॉलनी),दिपक जयलाल पटेल (वय-19, कसुंबा), आकाश ऊर्फ राध्ये अजय सोनार (लक्ष्मीनगर, ढाके वाडी) या तिघांना अटक केली होती.

तसेच पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तिघांनी लाठी शाळेतील चोरीची कबूली दिली आहे.

यात एक अल्पवयीन संशयीतांचा समावेश असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगीतले आहे. संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्या. एन.के. पाटील यांच्या न्यायालयाने तिघांना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. किशोर तडवी यांनी कामकाज पाहिले.

गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत. तसेच आकाश याला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, 6 जिवंत काडतूस आणि एक एअरगन असा ऐवज जप्त करण्यात आला होता.

त्याच्या आणखी एका साथीदाराकडून तलवार आणि सुरा पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणी काल पोलिस नाईक पंकज शिंदे याच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार आनंदसींग पाटिल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या