Monday, May 6, 2024
Homeनगरखडसे यांच्यानंतर मलाही ईडीची नोटीस येऊ शकते!

खडसे यांच्यानंतर मलाही ईडीची नोटीस येऊ शकते!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar’

भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते.

- Advertisement -

बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिला.

दरम्यान, ओबीसी समाज कोणाच्या विरोधात मोर्चे काढत नाही. कोणाचा उपकार, मोर्चा काढल्याने ओबीसींना आरक्षण मिळाले असून डॉ. आंबेडकर यांच्या घटनेमुळे आणि मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे. ओबीसींचे आरक्षण कोणी काढू शकत नाही आणि काढण्याचा प्रयत्न केल्यास 54 टक्के असणारा हा समाज रस्त्यावर उतरतील, असा इशारा मंत्री वडेट्टीवर यांनी यावेळी दिला.

ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय वडेट्टीवार नगरला आले आहेत. खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, भाजप हा मुळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे.

त्यांना अन्य घटकांशी काहीही देणेघेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते. आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, आम्ही त्याला समोरे जाऊ. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की येथे कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही. दिवस बदलत राहतात. जे पेराल ते उगवेल. नंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही व़डेट्टीवार यांनी दिला.

दरम्यान, ओबीसी ओबीसीच नाहीत अशी याचिका बाबा सराटे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. हा प्रकार म्हणजे मालक घराबाहेर आणि बाहेरचे घरात अशातला हा प्रकार आहे. ओबीसी समाज हा विखुरलेला आहे, आजही म्हणावा तसा तो जागरूक नाही. समाज एक झाल्याशिवाय ओबीसींना भवितव्य नाही आणि पुढची पिढी बरबाद होण्याची भीती आहे.

बाराबलुतेदारांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद पुढच्या बजेटमध्ये होईल. छत्रपती शाहू महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे राहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बाराबलुतेदारातुनच निर्माण झाले म्हणून आम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे, मात्र आधी आमचं मिळावं असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे असा टोला वडेट्टीवार यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे नाव न घेता मारला.

आत्महत्याग्रस्त नाभिक बांधवांच्या कुटूंबियांना मदत

करोना प्रादुर्भावाच्या काळात नाभिक समाजात 15 आत्महत्या घडल्या त्यांना दोन लाख रुपये मिळावेत ही आमची मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एक लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या