Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकआंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिततज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिततज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली….

- Advertisement -

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याबरोबरच त्रिज्या, व्यास, क्षेत्रफळ, लसावि, मसावि, वर्गमूळ, घनमूळ, प्रमेय, सिद्धता अशा गणिती संज्ञा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या गणिती कुटप्रश्नांचे निराकरण करून आजवर दिलेल्या गणितातल्या सर्व परीक्षांत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची

किमया साधणाऱ्या दिलीप गोटखिंडीकरांचे संपूर्ण जीवन म्हणजे गणित एके गणिताचा पाढाच होता. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांची निर्मिती आणि तपासणी अध्यापकांचे प्रशिक्षण, गणिततज्ञांची संक्षिप्त चरित्रे, वैदिक गणिताचा गाढा अभ्यास, गणित प्रयोगशाळेच्या निर्मितीत पुढाकार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणिती परिषदामध्ये प्रबंध सादरीकरण असे चौफेर काम त्यांनी केले होते.

दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर नाशिकमध्येच लहानाचे मोठे झाले. संख्या आकडे याकडे आकर्षण असल्यामुळे त्यांचा कल गणिताकडे होता. पेठे विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचे निधन झाल्याने नाशिकमधील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये उमटत आहेत.

आंतरराष्ट्रीय गणिततज्ञ दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे दुःखद निधन झाले. नाशिकच्या पेठे विद्यालयात नोकरी करत असतांना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. गणित विषयातील तज्ञ गोटखिंडीकर यांनी भास्कराचार्य गणित नगरी उभारणीमध्ये महत्वाची जबाबदारी पार पडली.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. आजवर त्यांची ७३ पुस्तके देखील प्रकाशित झाली आहे. त्यांच्या निधनाने गणित क्षेत्रातील एक अनमोल रत्न हरपले असल्याची भावना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या