Friday, May 3, 2024
Homeजळगावदेशदूतच्या दणक्यानंतर शवविच्छेदगृहातील रेफ्रीजरेटरची दुरुस्ती

देशदूतच्या दणक्यानंतर शवविच्छेदगृहातील रेफ्रीजरेटरची दुरुस्ती

जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कंत्राटदार जुमानेना

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

- Advertisement -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहातील रेफ्रीजरेटर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याबाबत दै. देशदूतने वृत्त प्रकाशीत केले होते.

जिल्हा रुग्णालयाने याची दखल घेत कंत्राटदाराकडून हे रेफ्रीजरेटर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असल्याने बेवारस मृतदेह ठेवण्याचा प्रश्न सुटणार आहे.

बेवारस मृतदेह आढळून आल्यास त्याची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याचा मृतदेह कुजून जावून नये म्हणून तो तीन दिवसांपर्यंत शवविच्छेदनगृहातील रेफ्रीजरेटर मध्ये ठेवला जातो.

बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवविच्छेदनगृहात सहा रेफ्रीजरेटर बसविण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे रेफ्रीजरेटर सुरु असून सहा पैकी चार रेफ्रीजरेटर गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने बेवारस मृतदेहाची मेल्यानंतरही अवहेलना सुरु असल्याच्या खळबळजनक प्रकाराबाबत दै. देशदूतने वृत्त प्रकाशित केले होते.

दरम्यान आज या कंत्राटदार कंपनीकडून दोन अभियंते व कामगार पाठविले असून त्यांच्याकडून रेफ्रीजरेटरची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

अडीच महिन्यानंतर निघाला मुहूर्त

शासकीय रुग्णालयातील रेफ्रीजरेटर दुरुस्तीसाठी चेन्नईतील फॅबर सिंदौरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचा कंत्राट दिला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून हे रेफ्र्रीजरेटर बंद अवस्थेत असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून या कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या.

परंतु कंत्राटदाराकडून अडीच महिन्यानंतर रेफ्र्रीजरेटर दुरुस्तीचा मुहूर्त सापडला असून आज पासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

यामुळे झाले रेफ्र्रीजरेटरमध्ये बिघाड

वैद्यकीय रुग्णालयातील तीन रेफ्रीजरेटर असून प्रत्येक रेफ्रीजरेटरमध्ये दोन भाग आहे. यातील दोन रेफ्रीजरेटर बंद अवस्थेत होते.

देखभाल दुरुस्ती करणारी फॅबर सिंदौरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे अभियंत्यांसह परभणी येथील मेकॅनिक सैय्यद समिर यांनी पाहणी केली. यात एका रेफ्रीजरेटरमधील गॅसची लेव्हल कमी होवून त्याला गॅस चार्जिंगसाठी अडथळे येत होते.

तसेच दुसर्‍या रेफ्र्र्रीजरेटरधील कुलींग फॅन खराब होवून यातील संपुर्ण वायरिंग जळलेल्या अवस्थेत असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

स्टॅपीलायझर बसविण्याबाबत देणार लेखी सूचना

गेल्या काही वर्षांपुर्वी हेच रेफ्रीजरेटरमध्ये बिघाड झाला होता. व्होलटेज सुरळीत राहण्यासाठी रेफ्र्रीजरेटरला स्टॅपीलायझर बसविण्याबाबत तोंडी सांगितले होते.

परंतु तरी देखील स्टॅपीलायझर बसविण्यात आले नसून यात पुन्हा बिघाड झाला आहे. त्यामुळे आता लेखी स्वरुपात स्टॅपीलायझर बसविण्याबाबत सांगितले जाणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या