Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्ररिलायन्सचे स्पष्टीकरण : शेतीची जमीन खरेदी करणार नाही

रिलायन्सचे स्पष्टीकरण : शेतीची जमीन खरेदी करणार नाही

मुंबई:

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पंजाबमध्ये जिओचे १५०० पैक्षा जास्त टॉवरचे नुकसान झाले. त्यानंतर सोमवारी रिलायन्स रिटेलने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.

- Advertisement -

कॉर्पोरेट शेती किंवा कंत्राटी शेतीशी आमचा काही संबंध नाही. कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट शेतीत हस्तक्षेप करण्याबाबत आमचा कोणताही विचार नसल्याचे म्हणत आपली भूमिका रिलायन्सने स्पष्ट केली आहे. कंपनीने दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की, ती शेतीची जमीन खरेदी करणार नाही.रिलायन्सने सोमवारी एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की ते शेतकर्‍यांकडून थेट धान्य खरेदी करत नाही. पुरवठादार किंवा MSPच्या दराने ते शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात किंवा असे पुरवठादार जे शेतकऱ्यांकडून MSP ने धान्य खरेदी करतात अशाच पुरवठादारांकडून कंपनी धान्य खरेदी करते. कंपनीने म्हटले आहे की कमी किंमतीत दीर्घकालीन खरेदी कराराचा कंपनीने कोणताही करार शेतकऱ्यांसोबत केलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या