Monday, May 6, 2024
Homeजळगावदारु पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात टाकली बियरची बाटली

दारु पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात टाकली बियरची बाटली

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

लग्नाच्या कार्यक्रमात दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राकेश दिलीप कुंभार (25) या तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंप्राळ्यातील गणपती नगरात शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित योगेश रवींद्र चौधरी रा. गणपती नगर, पिंप्राळा यास पोलिसांनी अटक केली आहे.

दारु पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण

राकेश दिलीप कुंभार या तरुणाच्या घराससमोर 2 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता लग्नानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता.

राकेश कुंभार घरीच ओट्यावर बसून कार्यक्रम पाहत होता. लग्नात नाचणारा राकेश मिलिंद जाधव (वय 25,रा. मढी चौक पिंप्राळा), गंप्या (पुर्ण नाव माहित नाही), वण्या (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. बौध्दवाडा आणि योगेश पाटील चायनिजवाला (रा.गणपती नगर पिंप्राळा) या चौघांनी राकेश कुंभारजवळ येवून दारु पिण्यासाठी पैसे मागितले.

त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारली व खिश्यातील 500 रूपये जबरी काढले व बिअरचा बाटलीचा धाक दाखवून गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची साखळी जबरी हिसकावून घेतली.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

या पथकाने केली अटक

गुन्ह्यातील संशयित योगेश चौधरी हा गणपती नगर पिंप्राळा येथील असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी , पोलीस नाईक रविंद्र पाटील, पोलीस नाईक विनोद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रवी चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल हरीश डोईफोडे यांच्या पथकाने त्याचा शोध त्यास अटक केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या