नाशिक l Nashik (प्रतिनिधी)
नाशिक सिंधी समाजाच्यावतीने प्यारा परीवार सिंधी मॅरेज मेळाव्याच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. कराेनाचा प्रादुर्भावात परीस्थिती पूर्वपदावर येत असतांना, समाजा तर्फे हा मेळावा घेतला जाणार आहे.
येत्या फेब्रुवारी २०२१ मध्ये सिंधी समाजाचा हा मेळावा होणार आहे. कार्यक्रमाची तारीख व ठिकाण लवकर जाहीर केले जाणार आहे. सहभागासाठी विवाहेच्छुक वधू व वराच्या पालकांनी प्यारा परीवार, नाशिक सिंधी समाज मॅरेज ब्युरो यांच्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या पूर्वी देखील प्यारा परीवार मार्फत यशस्वीरित्या वधू-वर परीचय मेळाव्यांचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशभरातून सुशिक्षित तरूण उमेदवार सहभागी झाले होते. मेळाव्यातून भावी साथीदाराचा शोध अनेक युवकांचा पूर्ण झाला होता. कराेनानंतर परीस्थिती पूर्वपदावर येत असतांना, पुन्हा एकदा मेळावा घेतला जाणार आहे.
आगामी फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या या मेळाव्यात वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील उच्च शिक्षित उमेदवार सहभागी होणार असल्याने वधू-वराचा शोध घेणाऱ्या पालकांना ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
मेळाव्यात मर्यादित प्रवेश दिले जाणार असल्याने अधिक माहितीसाठी श्याम मोटवानी, ॲड. प्रकाश आहुजा, महेश नागपाल, रितिका कलानी, ॲड. भारती कटारिया, देवी दीदी, प्रकाश मनवाणी, सतीश पंजवानी, दीपू आहुजा, हेमंत भोजवानी, सुनील केसवानी यांच्याशी संपर्क साधता येईल.