Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडासिडनी टेस्ट: भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजीवर ICC ने अहवाल मागवला

सिडनी टेस्ट: भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजीवर ICC ने अहवाल मागवला

सिडनी:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीने मागवला आहे.

- Advertisement -

रविवारी तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद सिराजबद्दल प्रेक्षकांनी अपशब्द वापरले. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू एकत्र आले आणि त्यांनी याची तक्रार पंचांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी अपशब्द वापरणाऱ्या प्रेक्षकांच्या गटाला शोधले आणि सहा प्रेक्षकांना स्टँडमधून बाहेरचा रस्ता दाखवला. याआधी तिसऱ्या दिवशीही प्रेक्षकांमधून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. याची तक्रार भारतीय टीमने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, अंपायर आणि आयसीसी मॅच रेफ्री यांच्याकडे केली होती. वर्णद्वेषी टिप्पणीची तक्रार केल्यानंतर काही मिनिटे खेळ थांबला.पोलिसांनी त्या सहा प्रेक्षकांना स्टेडियम सोडून जायला सांगितले, यानंतर खेळाला सुरूवात झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या