Sunday, May 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी; नेमकी...

Loksabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अचानक अजितदादांच्या घरी; नेमकी काय चर्चा झाली?

मुबंई | Mumbai

आज तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान (Voting) पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाचा देखील समावेश आहे. या मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या एकमेकींविरोधात रिंगणात आहेत.

- Advertisement -

निवडणुकीच्या प्रचारावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. मात्र, अशातच आज सकाळी बारामतीत मतदान (Voting) सुरु असतानाच सुप्रिया सुळे (Supirya Sule) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुळे या अजित पवारांच्या काठेवाडी येथील निवासस्थानी ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. त्यावेळी घरात अजित पवार देखील होते. यावेळी सुळे यांनी काकू आशाताई पवार यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर सुळे त्याठिकाणाहून निघून आल्या. तसेच या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला.

हे देखील वाचा : आमदार दत्तात्रय भरणेंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काम करणाऱ्याला शिवीगाळ? रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट

यावेळी त्या म्हणाल्या की, “मी आशा काकींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. यावेळी घरात फक्त मी आणि काकीच होते. त्यामुळे मी काकींची भेट घेतली. हे माझ्या काका, काकींचे घर असून माझं लहाणपण याच घरात गेले आहे. मी या घरात दोन-दोन महिने राहिले आहे. त्यावेळी दोन-दोन महिने माझ्या आईशी बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईंनी माझे केले नाही, तेवढे माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवार आमनेसामने आल्यामुळे ही निवडणूक देशपातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरीकडे मतदानावेळी इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatray Bharne) यांचा एका व्यक्तीला मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळपासून सुरुवात

- Advertisment -

ताज्या बातम्या