राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
सोमवारी (दि.11) रात्रीच्या सुमारास राहुरी शहरातील शिवाजी चौकातील संतोष नागरे यांचे संतोष ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडून
- Advertisement -
जवळपास 2 लाख 34 हजार रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज चोरून नेला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत शहरातच राहणारा यश अविनाश काटकर हा 16 वर्षांचा शाळकरी मुलगा संध्याकाळी दुकानात केक आणण्यासाठी गेला होता. या मुलाचे अपहरण झाले आहे. तसेच राहुरी फॅक्टरी येथे विनयभंगाची घटना घडली आहे. तर राहुरी शहरातून व तहसील आवारातून अनेक दुचाकी चोरी गेल्या आहेत.