Wednesday, May 8, 2024
Homeनगरबेलपिंपळगावकरांचे निकालाकडे लक्ष; अनेकांनी लावल्या पैजा

बेलपिंपळगावकरांचे निकालाकडे लक्ष; अनेकांनी लावल्या पैजा

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर

- Advertisement -

आता उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष निकालाकडे लागले असून कोण जिंकणार? याच्या अंदाजाचीच चर्चा सर्वत्र चालू असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील मोठे गाव असून याठिकाणी 13 जागांसाठी मतदान मोठ्या प्रमाणावर झाले. रिंगणातील सर्व 31 उमेदवार आपला विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत. गावात चहाच्या हॉटेलात, चौका-चौकांत, वाडी-वस्तीवर सध्या हीच चर्चा सुरू आहे.

आपला पॅनल निवडून येणार, मला इतकं लीड असेल, त्याची कशी जिरवली तर काही ठिकाणी कोण विजयी होणार, कोणत्या पॅनलचे जास्त सदस्य निवडून येणार, कोणाचा सरपंच होणार यावर पैजा सुरू झाल्या आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीत कोण कोण विजय मिळवून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोमवारी गुलाल आपलाच असेल असे सर्वच राजकीय नेते बोलताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी मात्र हे चित्र स्पष्ट होईल की 3322 मतदार राजाने गावातील कोणत्या भावी ग्रामपंचायत सदस्याला निवडून दिले आहे. गावातील राजकारणात ग्रामपंचायत मतदान म्हटले की, हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप केले जातात.

जिरवा-जिरवी केली जाते. पण तरीदेखील गावात मतदान शांतपणे झाले नात्यागोत्याचं गाव असल्याने यावेळी कोण बाजी मारेल हे मात्र उद्या स्पष्ट होईल. निवडणुकीची चांगली जोरदार चर्चा होणार हे आधीच स्पष्ट झाले होते कारण सरपंच कोण होणार हे नंतर समजणार असल्याने उद्या ती पण उत्सुकता लागणार आहे.

जर एकहाती सत्ता आली नाही तर कोणाला आपल्या पार्टीत घ्यायचे याची आजपासूनच गावातील पुढारी खासगीत चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे उद्या होणार्‍या मतमोजणीची वाट हे पुढारी मोठ्या आशेने बघत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते यावेळी गावात ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या