Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; 'या' विषयावर...

Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशासह राज्यात लोकसभा निवडणूकींची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून कालच तिसऱ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले आहे. त्यानंतर उर्वरित टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये नाशिक लोकसभेचा (Nashik Loksabha) देखील समावेश असून येत्या २० मे रोजी नाशिक लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशकात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार चालू आहे. अशातच आज सकाळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मंत्री भुजबळ यांची भेट घेतली आहे.

नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार लवकर जाहीर करण्यात आला होता. पंरतु, महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता. अखेर १ मे रोजी महायुतीने हेमंत गोडसे (Hemant Godase) यांना उमेदवारी जाहीर करून आपला उमेदवार घोषित केला होता. या जागेसाठी महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील इच्छुक होते. मात्र, त्यांची स्पर्धा ही प्रामुख्याने महायुतीतील (Mahayuti) हेमंत गोडसे यांच्याशी होती. शेवटी या स्पर्धेत गोडसे यांनी बाजी मारत उमेदवारी मिळवली. त्यानंतर आज गोडसे यांनी मंत्री भुजबळ यांची नाशिकमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये पुढील काळात निवडणुकीचा प्रचार कशा पद्धतीने करायचा याविषयी चर्चा झाली. त्यानंतर गोडसे आणि भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

यावेळी बोलतांना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवायचे असल्याने नाशिकमधील दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गोडसे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शंभर टक्के त्यांच्या पाठीशी असून आमचे कार्यकर्ते प्रचारात सक्रीय झाले आहेत. हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार असल्याने आम्ही सर्वजण त्यांच्या प्रचारात सहभागी होणार आहोत. ते बोलवतील तेव्हा किंवा त्यांनी आयोजित केलेल्या सभेला देखील मी हजर राहणार आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

हे देखील वाचा : “ईव्हीएम मशीन हॅक करून देतो अडीच कोटी द्या”; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली मागणी

तर गोडसे म्हणाले की, छगन भुजबळ हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. आज त्यांच्यासह महायुतीच्या सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटून प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली. भुजबळ महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे मोठी ताकद मिळाली असून त्यांच्यामुळे माझा विजय सोपा झाला आहे, असे हेमंत गोडसेंनी म्हटले. त्यामुळे आता नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने महायुतीच्या प्रचाराचा धुरळा उडतांना पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा : राज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ‘ही’ याचिका फेटाळली

दरम्यान, नाशिक लोकसभेसाठी अर्ज माघारीनंतर ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. यामध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) वंचितचे करण गायकर आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांसह आदी उमेदवारांचा समावेश आहे. वाजे व गोडसे हे दोन्ही उमेदवार शिवसेनेतील फुटीआधी एकाच पक्षात होते. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर गोडसे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा तर राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा नाशिकची खरी लढत ही दोन शिवसैनिकांमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या