Monday, May 6, 2024
Homeनगरकळमकरांसह कार्यकर्त्यांचा ‘गुरुमाऊली’त प्रवेश

कळमकरांसह कार्यकर्त्यांचा ‘गुरुमाऊली’त प्रवेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व सदिच्छा मंडळाचे नेते गोकुळ कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सदिच्छा मंडळाचे विविध तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी

- Advertisement -

यांनी नुकताच शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला.

बापूसाहेब तांबे प्रणित गुरूमाऊली मंडळात प्रवेश करणार्‍यांमध्ये कारभारी बाबर, यादव सिनारे, गौतम साळवे, कैलास शिंदे, रवींद्र रोकडे, छाया पवार, प्रज्ञा भोसले, मीनाक्षी अवचरे, अश्फाक शेख, केरु डोके, अजय सोनवणे संतोष मगर, दत्ता लामखडे, रामकृष्ण मेहेत्रे, अरुण फंड, संतोष मगर, राजू आतार यांचा समावेश आहे.

शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या गुरुमाऊली मंडळाच्या आमसभेत हा प्रवेश सोहळा झाला. अध्यक्षस्थानी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल होते. यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, शिक्षक बँकेचे चेअरमन राजू राहणे, व्हाईस चेअरमन उषाताई बनकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, संदीप मोटे, पीडी सोनवणे, राजू साळवे,मोहनराव पागिरे, शकिल बागवान यांच्यासह शिक्षक बँकेचे सर्व संचालक, शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष तांबे यांनी मनोगतामध्ये बँकेचे संचालक मंडळ अतिशय काटकसरीने कारभार करीत असून दोन टक्केच्या फरकाने हा कारभार राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. सातारा बँकेच्या निवडणुकीमध्ये नगर बँकेचे उदाहरण दिले जात आहे.

या वर्षी देखील सभासदांना लाभांश समाधानकारक देण्यात येईल. कर्जाचा व्याजदर कमी करण्याच्या मागणीबाबत संचालक मंडळ निश्चित विचार करेल असे सांगितले. यावेळी आबासाहेब दळवी, साहेबराव अनाप, अजय सोनवणे, गौतम साळवे, मीनाक्षी अवसरे, राजू साळवे, सलीमखान पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाट, किसन खेमनर, बाबा खरात, राजेंद्र सदगीर, पी.डी.सोनवणे, शिवाजी भालेराव, राजू इनामदार, संतोष साबळे, शुभांगी निकम, कल्पना पडवळ, सुरेखा पावडे, अनिता दिघे, वंदना असणे,चंद्रकांत धामणे, गणेश भोसले, संतोष बारगळ, नंदकुमार आवटी, रंजीत कुताळ, अंजली मुळे, गीता बाप्ते, सूर्यकांत काळे, सुरेश निवडूंगे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या