जळगाव – Jalgaon
शेतात कापूस वेचण्याचे काम करुन भादली गावाकडे 15 ते 16 महिलांना घेवून परतणारे ट्रॅक्टर जळगाव भादली फाट्यावर जलसंपदा विभागाच्या पाटचारीत ट्रॅक्टर उलटल्याची घटना सोमवारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
- Advertisement -
या अपघातात ट्रॅक्टरमधील हिरकणी हिरामण सोनवणे वय 42 रा भादली या जागीच ठार झाल्या असून इतर महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.