Wednesday, May 8, 2024
Homeनगरपाणी योजनेतील मनमानीविरोधात आंदोलन करणार - धनंजय जाधव

पाणी योजनेतील मनमानीविरोधात आंदोलन करणार – धनंजय जाधव

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्‍याची जलस्वराज टप्पा क्र. 2 च्या गावच्या पाणी योजनेतील सुरू असलेली

- Advertisement -

मनमानी व पाणी मिटरसाठी जादा पैसे घेऊन कुणाचे हित साधत आहे, असा प्रश्न उपस्थित करून याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा पुणतांबा विकास आघाडीचे धनंजय जाधव यांनी दिला आहे.

पुणतांबा परिसरातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे वितरण व्यवस्था आणि साठवण क्षमता याचा बिघडलेला ताळमेळ यामुळे गावाला कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आणि गावाला पाणी प्रश्नाचा टंचाईतून मुक्त करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करून माजी मुख्यमंत्री फडणविस यांच्यामुळे व माजी आ. स्नेहलता कोल्हे याच्या सहकार्याने गावाला पाणी साठवण तळ्याच्या जागेसह नव्याने पाण्याच्या टाक्या, सपूर्ण गावात वाड्या वस्त्यांवर पाईपलाईन मंजूर करून आणण्यात मोठे यश मिळाले म्हणून जागेसह संपूर्ण पाणीपुरवठा योजना जलस्वराज टप्पा क्र. 2 योजनेत समावेश करण्यात यश आले आणि 17 कोटी खर्चाची योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून सुरू आहे.

या योजनेत नागरिकांना नळ जोडणी देताना पाणी मिटरसाठी एक हजार एक्केचाळीस रुपये घेण्याचे पूर्वी झालेल्या ग्रामसभेत ठरले होते. परंतु आता त्याऐवजी एक हजार पाचशे रुपये घेण्याचे काम ग्रामपंचायत सत्ताधारी करीत आहेत. यासाठी कोणतीही ग्रामसभा घेण्यात आली नाही किवा नळ जोडणीची जलस्वराज टप्पा क्र. 2 च्या पाणी योजनेत शासनाच्या काही सूचना आहे का? या सर्व माहितीचा खुलासा ग्रामपंचायतीच्या सत्ताधार्‍यांनी केलाच नाही म्हणून सध्या सत्ताधारी ग्राम पंचायत कारभारात व पाणी योजेनेच्या कामात मनमानी करीत आहेत. ही मनमानी ग्रामस्थ सहन करणार नाही.

परंतु सध्याचे सत्ताधारी मनमानी पद्धतीने पाणी योजनेचे नवीन नळ जोडणी द्यायची आहे त्यासाठी रुपये 1500 नागरिकांकडून घेत आहेत परंतु मागे झालेल्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे 1041 रुपये घ्यायचे ठरवले होते. त्यात बदल करून गावातील नळ जोडणी धारकाकडून 1500 रुपये घेण्याचे काम ग्रामपंचायत करित आहे.

पूर्वी झालेल्या ग्राम सभेच्या ठरावाप्रमाणे जास्तीचे पैसे घ्यायचे नाहीत, असे ठरलेले असताना हा बदल कोणी केला? का केला, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. आता हा प्रश्न आहे की हा बदल कधी झाला? आणि हा बदल करण्यासाठी ग्रामसभा घेतली का? हे पैसे गोळा करण्याचे कारण काय? याचा फायदा कोणाला होणार? ही मनमानी चालू आहे, तरी ही मनमानी त्वरित थांबवावी अन्यथा या विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या