Friday, May 3, 2024
Homeनगरमहालक्ष्मी हिवरे येथे पुन्हा एकदा बिबट्याचा संचार

महालक्ष्मी हिवरे येथे पुन्हा एकदा बिबट्याचा संचार

चांदा |वार्ताहर|Chanda

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे पुन्हा एकदा बिबट्याचे आगमन झाले असून शनिवारी रात्री बिबट्याने कुत्रे फस्त केले.

- Advertisement -

महालक्ष्मी हिवरा परिसरामध्ये बिबट्याचे भय थांबता थांबेना. काही महिन्यांपूर्वी परिसरातील सांगळे मळ्यात अभय शिरसाट या बालकावर हल्ला केला होता. त्यानंतर राजेंद्र गायके यांच्या वासरावर हल्ला केला होता. तसेच बोरुडे यांच्या वस्तीवर गोठ्यातील कालवडीवरही हल्ला केला होता. त्यानंतर काही दिवस जात नाही तोच येथील गट न. 853 मध्ये राहणारे सलीम बाबा शेख यांच्या उसात एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केली.

यापूर्वी केदार वस्तीवर एक बिबट्या तर दोनच दिवसांपूर्वी चांदा येथील मुथा फार्म शेजारी एक बिबट्या जेरबंद झाला होता. चांदा महालक्ष्मी हिवरा परिसरामध्ये अजून तीन ते चार बिबटे असण्याची शक्यता या भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या