Thursday, May 2, 2024
Homeनाशिककॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग कार्यान्वित

देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर)

मागील नऊ महिन्यांपासून देवळालीतील नागरिकांसाठी एकमेव सरकारी हॉस्पिटल असलेल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये करोना उपचार केंद्र सुरू असल्याने अन्य आजारांवर उपचार घेणे कठीण झाले होते.

- Advertisement -

आता मात्र करोना कमी झाल्याने या हॉस्पिटलमधील बाह्य रुग्णसेवा 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी सांगितले. या निर्णयाने देवळालीसह पंचक्रोशीतील नागरिकांची आरोग्यसेवेची होणारी गैरसोय टळणार आहे.

मागील नऊ महिन्यांत देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने सर्व कोविड-19 आजाराच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले. तसेच त्याबद्दल हॉस्पिटलला सार्वजनिक आरोग्य कोविडसाठी आव्हान या श्रेणीत रक्षामंत्री अवॉर्डदेखील प्राप्त झाले आहे.

आता देवळालीसह पंचक्रोशीत करोनाही आटोक्यात आल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. आजपासून बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सर्व लोकप्रतिनिधींनी केले आहे.

नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत हे हॉस्पिटल पुन्हा सुरू करावे, अशी मागणी येथील रिपाइं व मनसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देऊन प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची भेट घेत केली होती. या सर्व बाबी ध्यानात घेत बोर्डाचे सीईओ अजय कुमार यांनी हा निर्णय घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या