Thursday, May 9, 2024
Homeदेश विदेशसीए परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली

सीए परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली

मुंबई :

चार्टर्ड अकाऊन्टंच्या जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

कोमलने ७५टक्के मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. कोमलने आर. ए. पोदार कॉलेजमध्ये २०१९मध्ये बी कॉमचं शिक्षण पूर्ण केले. तर याच दरम्यान ती सीए परीक्षेची तयारी करत होती. तिला ८०० पैकी ६०० गुण म्हजेच ७५ टक्के मिळाले आहेत. सुरतच्या मुदीत अग्रवालने दुसरा, तर मुंबईच्या राजवी नाथवनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

सीए जुन्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत तामिळनाडूच्या सलेममध्ये राहणाऱ्या एस्साकिराज एने ६९ टक्के अव्वल स्थान पटकावले.

दरम्यान, जुन्या अभ्यासक्रमापेक्षा नव्या अभ्यासक्रमाचा निकाल हा अधिक लागला आहे. सीए परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ५.८४ टक्के तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल १४.४७ टक्के लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या