Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथे हजारो कोंबडयांचा मृत्यू ?

नवापूर येथे हजारो कोंबडयांचा मृत्यू ?

नवापूर – Navapur – श.प्र :

शहरातील एका पोल्ट्री फार्मच्या हजारो कोंबड्या मेल्या असून त्यांना खड्ड्यात पुरण्यात आल्याच्या निनावी तक्रारीवरून आज तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी व तलाठयांनी संबंधित पोल्ट्री फार्मवर जाऊन पंचनामा केला.

- Advertisement -

या कोंबडयांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला याबाबत प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

शहरातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात शेड आहेत. प्रत्येक शेड मध्ये शंभर सव्वाशे कोंबड्या व कोंबड्यांचे पिलू मृत्युमुखी पडत आहेत, असे जवळजवळ दोन आठवड्यांपासून रोज सातशे आठशे कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याची निनावी तक्रार प्राप्त झाली होती.

त्यानुसार आज तहसिलदारांच्या आदेशाने मंडळ अधिकारी व तलाठयांच्या पथकाने संबंधीत पोल्ट्री फार्मवर जावून पंचनामा केला आहे. या मेलेल्या कोंबड्याचा अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

तालुक्यात तेरा ते चौदा कुकूटपालन व्यवसाय सुरु आहेत. 2006 मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. तेव्हापासून कुकूटपालन व्यवसायिकांनी कोंबड्यांना एच -5 ,एन -1 ची लागण होऊ नये यासाठीही खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती कुठल्याही पक्षाला झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नवापूर तालुक्यात अद्यापही कोंबड्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत.

याबाबत आमच्याकडे भोपाळचा अहवाल आहे. यात भारतातील कुठल्याही पोल्ट्रीतील कोंबडीला लागण झाल्याचे दिसून आलेले नाही.

परंतु भीतीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे. पशुसंवर्धन विभागातील तज्ञांशी संपर्क आहे, असे पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी सांगितले.

नवापूर शहरालगतच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या अकस्मात मृत्यू होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंडळ अधिकारी, नवापूर यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरचे मृत्यू हे राणीखेत या आजारामुळे होत असल्याचे पोल्ट्री चालकाने सांगितले आहे.

याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, नवापूर यांना सर्व पोल्ट्री फार्मच्या तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे कळविले आहे. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या