Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशAmazon च्या CEO पदावरून 'जेफ बेझोस' यांचा राजीनामा

Amazon च्या CEO पदावरून ‘जेफ बेझोस’ यांचा राजीनामा

दिल्ली l Delhi

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी मोठी घोषणा केली आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरुन पायउतार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या वर्षाअखेरपर्यंत ते त्यांचे पद सोडतील. यासह जेफ बेझोस यांनी अशी माहिती दिली आहे की, ते बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष असतील. बेझोस यांनी आपल्या कर्मचार्‍यांना त्यांना या निर्णयाबद्दल माहिती देणारे पत्र देखील पाठवले आहे.

या पत्रात बेझोस म्हणाले आहे की, अ‍ॅमेझॉन कंपनीचा मला बोर्डचे कार्यकारी अधिकारी आणि अँडी जेसी यांनी सीईओ बनवण्यात आले आहे, मला याचा आनंद होत आहे. या नव्या भूमिकेत काम करताना मी नव्या उत्साहाने आणि उमेदीने काम करेन. अँडी जेसीवर माझा पूर्ण भरवसा आहे. जवळपास 27 वर्षापूर्वी हा प्रवास सुरु झाला होता. अ‍ॅमेझॉन केवळ एक विचार होता, त्यावेळी त्याचे काहीच नाव नव्हते. मला त्यावेळी विचारण्यात यायचे की इंटरनेट काय आहे? आपण आज 13 लाख प्रतिभावान आणि कामाप्रती निष्ठा बाळगणाऱ्या लोकांना रोजगार देत आहोत. आम्ही कोट्यवधी ग्राहकांना आपली सेवा पुरवतो आहे आणि विस्तृत स्वरुपात जगातील सर्वात यशस्वी कंपनीच्या प्रस्थापित झालो आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.

बेजोस यांनी अ‍ॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे अँडी जेसीची यांच्या हातात सोपविणार आहेत. अँडी सध्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. बेझोस यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं असं आहे की, “मी अ‍ॅमेझॉनच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांशी नेहमी सलग्न राहणार आहे. सध्या फिलेन्थ्रॉपिक इनिशिएटिव्स म्हणजे कल्याणकारी योजना आणि डे-वन फंड (day one fund) आणि बेजोस अर्थ फंड (bezos earth fund) यावर फोकस करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अंतराळ संशोधन आणि पत्रकारितेशी संबंधित व्यवसायात सामील होण्यासही त्यांनी रुची दाखवली आहे.

बेजोस यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर गुगलचे (google) मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo) सुंदर पिचाई यांनी ट्वीट करत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याचबरोबर पिचाई यांनी अँडी जैसीना यांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

करोना संकटकाळामध्ये अमेझॉनने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. मीडीया रिपोर्ट्स नुसार, 2020 च्या शेवटच्या 3 महिन्यात अमेझॉनला 100 बिलियन डॉलर विक्रीमुळे रेकॉर्डब्रेक नफा झालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या